ग्रामोद्यमीGramodyami Enterprises WhatsApp
📍 लातूर · मराठवाडा

व्यवसाय वहीवरून मोबाईलवर

दुकान, गॅरेज, सलून, जिम, फूड स्टॉल, संघटना किंवा बचत गट. तुमच्या व्यवसायासाठी स्वतःचं ॲप, पूर्ण मराठीत, ग्राहकांच्या फोनवर एका लिंकने install होणारं.

पूर्ण मराठीतPlay Store ची गरज नाहीकमी इंटरनेटवरही चालतंस्थानिक मदत

👆 फोनभोवतीचे स्टिकर ओढून फेका · फोनवर swipe करा

१००% मराठी 📲 एका लिंकने install ☀️ सोलरसाठीही लातूरचं ❤️
🔧श्री गॅरेज
आजच्या सर्व्हिस7 गाड्या
MH24 · Splendorऑइल बदल
तयार ✓
MH24 · Activaब्रेक सर्व्हिस
काम सुरू
MH25 · Pulsarचेन सेट
नवीन
ग्राहकाला WhatsApp पाठवा
✂️स्टाईल सलून
आजच्या बुकिंग12 वेळा
10:30 सकाळीकेस कापणे · दाढी
बुक
11:15 सकाळीफेशियल
बुक
12:00 दुपारीरिकामी वेळ
उपलब्ध
वेळ बुक करा
🏋️फिट जिम
चालू सदस्य86 जण
फी बाकीया महिन्यात 5 सदस्य
आठवण
नवीन सदस्य3 जणांची नोंद
नवीन
हजेरीआज सकाळी 41
✓
फी reminder पाठवा
🍽️अनादि महेश फुडस्
आजच्या pre-order34 प्लेट
राहुल · 2 प्लेटपाणीपुरी
पैसे मिळाले
स्नेहा · 1 प्लेटशेवपुरी
तयार होतंय
FSSAIपरवानाधारक विक्रेता
✓
UPI ने पैसे द्या
🪙बचत ही बचत
गटाची एकूण बचत₹1,24,500
सुनीता पाटीलहप्ता + व्याज
₹1,200 ✓
मंगल जाधवमासिक बचत
₹500 ✓
रेखा शिंदेमासिक बचत
बाकी
ताळेबंद पाहा

आज विरुद्ध उद्या

वहीतल्या अडचणी, ॲपमधले उपाय

कार्डवर टॅप करा आणि पाहा, रोजचं काम ॲपने किती सोपं होतं.

तुमच्या व्यवसायासाठी

तुम्हाला ॲपमध्ये काय मिळेल?

आम्ही बनवलेली ॲप्स

लातूरमध्ये बनलेली, मराठी माणसासाठी

प्रत्येक ॲप एका खऱ्या गरजेतून सुरू झालं. 👆 कार्डवर टॅप करा आणि ॲपची झलक पाहा; आत swipe करून पुढचं ॲप.

बचत ही बचत

बचत गटाचा हप्ता, कर्ज, व्याज आणि ताळेबंद, सगळं मराठीत. महिला व पुरुष बचत गटांसाठी.

बचत गट

मंडईवाला

ताजी भाजी आणि फळं थेट घरपोच, फोनवरून ऑर्डर.

भाजी व किराणा

माझं तिकिट

लातूरमधील नाटकांची तिकिटे ऑनलाइन, प्रायोजक जाहिरातींसह.

मनोरंजन

Expert Solar Solutions

सोलर ग्राहक नोंदणी, सबसिडी मार्गदर्शन आणि leads admin panel.

सोलर

अनादि महेश फुडस्

पाणीपुरी गाडीसाठी pre-order, UPI पेमेंट आणि FSSAI माहिती.

फूड स्टॉल

भेटेल की

मालमत्ता खरेदी-विक्री आणि रेंटसाठी ब्रोकर listing, KYC आणि QR शेअरिंग.

रिअल इस्टेट

Battery Master

आगारातील हेवी-ड्युटी बॅटऱ्यांची नोंद, तपासणी आणि देखभाल.

परिवहन

रोजनिशी

एसटी कर्मचाऱ्यांसाठी रोजच्या ड्युटीची आणि कामाची डायरी.

परिवहन

शुद्ध दूध

शेतकऱ्याकडून थेट घरापर्यंत दूध वितरणाचा हिशोब.

दुग्ध व्यवसाय

खेळघर

मुलांसाठी मराठी-इंग्रजी शिकण्याचे खेळ.

शिक्षण

रिक्षा साथी

लातूरमधील रिक्षा प्रवासासाठी सोपं ॲप.

प्रवास

आमचं नवीन काम · Expert Solar Solutions

सूर्य सरकवा, घर उजळवा ☀️

लातूरच्या Expert Solar Solutions साठी ग्राहक नोंदणीचं ॲप आणि leads चं admin panel बनवलं. घराच्या छतावर सोलर, PM सूर्य घर सबसिडीचं मार्गदर्शन आणि मोफत साईट सर्व्हे, सगळं एका लिंकवर.

  • ☀️ 1 / 2 / 3 kW निवड
  • 🏛️ सबसिडी हवी का, एका टॅपवर
  • 📲 नोंद थेट WhatsApp वर
  • 📋 leads साठी admin panel
👆 सूर्याला बोटाने आडवं ओढा · निर्मिती 0.0 kW (3 kW प्रणालीचं उदाहरण)

काम कसं होतं

चार सोप्या पायऱ्या

  1. 1

    चर्चा

    फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटून तुमचा व्यवसाय आणि गरज समजून घेतो.

  2. 2

    नमुना (Demo)

    तुमच्या नावाचं नमुना ॲप तुमच्या फोनवर पाठवतो. बदल सुचवा.

  3. 3

    ॲप लाइव्ह

    तुमच्या नावाने ॲप चालू. ग्राहक एका लिंकने install करतात.

  4. 4

    देखभाल

    पुढील बदल, नवीन सोयी आणि मदत, फोनवरच.

सेवा आणि साधना

ग्रामोद्यमी हा लातूरमधील छोटा, स्थानिक उपक्रम आहे. मोठ्या शहरातलं तंत्रज्ञान गावातल्या दुकानदार, कारागीर, बचत गट आणि संघटनांपर्यंत, त्यांच्याच भाषेत आणि परवडेल अशा खर्चात पोहोचवणं, हेच आमचं काम.

मराठीपहिली भाषा
लातूरस्थानिक मदत
Installएका लिंकने फोनवर
सुरक्षिततुमचा डेटा तुमचाच

शंका

नेहमीचे प्रश्न

ॲप Play Store वरून घ्यावं लागेल का?

नाही. लिंक उघडून "Install" दाबलं की ॲप थेट फोनवर येतं. गरज असेल तर Play Store वरही आणता येतं.

मला computer येत नाही, तरी चालेल का?

हो. ॲप पूर्ण मराठीत आहे आणि सगळं काम मोबाईलवरूनच होतं. सुरुवातीला आम्ही वापर शिकवतो.

खर्च किती येईल?

तुमच्या व्यवसायाला कोणत्या सोयी हव्या त्यावर खर्च ठरतो. आधी चर्चा, मग स्पष्ट कोटेशन. लपलेला खर्च नाही.

पैसे कसे भरायचे? Refund मिळतो का?

काम टप्प्याटप्प्याने (milestone) होतं आणि पैसेही तसेच. काम सुरू होण्याआधी रद्द केलं तर पूर्ण रक्कम परत. सविस्तर नियम Refund Policy मध्ये.

माझी माहिती सुरक्षित राहील का?

तुमचा डेटा तुमचाच. तो कोणालाही विकला किंवा दिला जात नाही. सर्व ॲप्स https वर, सुरक्षित पद्धतीने बनवली जातात.

संपर्क

तुमचं ॲप कसं असावं, बोलूया

WhatsApp वर फक्त व्यवसायाचं नाव आणि प्रकार पाठवा. आम्ही पुढची माहिती देतो.

फोन / WhatsApp96040 42249
Emailgramodyami@gmail.com
पत्तामु. साखरा, पो. मुरूड-अकोला, ता. व जि. लातूर, महाराष्ट्र 413511